शिराळा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांची उलेखनीय कामगिरी
वाकुर्डे /वार्ताहर
शिराळा पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांची उलेखनीय कामगिरी शिरशी ता.शिराळा येथील खून प्रकरणातील संशयित आरोपी शंकर नाना तटले वय ५८ याच्या २४ तासात मुसक्या आवळण्यात यश आले आहे. शिरशी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून शंकर तटले याने बाळु घाटके याचा कुर्हाडीने वार करून खुन करून पसार झाला होता. बाळू तटले यास लांड गडगादरा नामक शिरशी परिसरात झुडपात लपून बसलेला आज ४ वाजुन १५ मिनिटांच्या दरम्यान मिळून आला.
त्याचे शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णा पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी शिराळा पोलीस ठाणेमध्ये चार पोलिस पथके तयार करून शोधमोहीम चालू केली होती. यावेळी विशाल पाटील व त्यांच्या पथकास २४ तासाच्या आत आरोपी पकडण्यात यश आले आहे.
यामध्ये सहा पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहा पोलीस फौजदार गणेश झांझरे, हवालदार कालिदास गावडे, शिवाजी पाटील, भाऊसाहेब कुंभार, महेश साळुंखे, पोलिस नाईक विनोद पाटील, संदीप पाटील धनाजी नायकल, दीपक हांडे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पवार, नितीन घोरपडे, रणजीत ठोमके, धनंजय नलवडे यांनी सहभाग घेतला होता.