642 कोरोनामुक्तः मनपा क्षेत्रात 198 वाढलेः ग्रामीण भागात 977 रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे तांडव थांबण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी उंच्चाकी 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात एक हजार 175 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात 198 तर ग्रामीण भागात तब्बल 977 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 642 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या उपचारात 11 हजार 10 रूग्ण आहेत.
महापालिका क्षेत्रात 198 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात नवीन 198 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली शहरात 133 तर मिरज शहरात 65 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 21 हजार 197 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 75 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
ग्रामीण भागात 977 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. आता जिल्हÎातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. रूग्ण आटोक्यात येण्याची कोणतीही चित्र दिसून येत नाही. प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. आटपाडी तालुक्यात 116 तर कडेगाव तालुक्यात 83 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 159 तर पलूस तालुक्यात 51 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 104 तर जत तालुक्यात 105 रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 54, मिरज तालुक्यात 94 रूग्ण वाढले. शिराळा तालुक्यात 67 तर वाळवा तालुक्यात 144 रूग्ण वाढले आहेत.
तब्बल 32 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात शनिवारी उंच्चाकी 32 जणांचे मृत्यू झाले आहेत. एकाच दिवशी 32 जणांना कोरोनाने प्राण गमावावे लागले आहेत. महापालिका क्षेत्रात चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरातील दोन आणि मिरज शहरातील दोघांचा यामध्ये समावेश आहे. आटपाडी तालुक्यात दोन तर कडेगाव तालुक्यात दोन आणि खानापूर तालुक्यात एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यात तीन तर तासगाव तालुक्यात चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जत तालुक्यात तीन तर कवठेमहांकाळ तालुक्यात दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यात चार तर शिराळा तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात वाळवा तालुक्यात उंच्चाकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
642 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 642 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 68 हजार 41 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 54 हजार 961 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवे रूग्ण 1175
उपचारात 11010
बरे झालेले 54961
एकूण 68041
मृत्यू 2070
शनिवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 116
कडेगाव 83
खानापूर 159
पलूस 51
तासगाव 104
जत 105
कवठेमहांकाळ 54
मिरज 94
शिराळा 67
वाळवा 144
सांगली शहर 133
मिरज शहर 65
एकूण 1175
लसीकरण
आजचे लसीकरण 2241
आजअखेर लसीकरण 482277