प्रतिनिधी / शिराळा
सांगाव ता. शिराळा येथे ग्रामीण पत्रकारांची कार्यशाळा संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. जेष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन अध्यक्षस्थानी होते. त्यांनी हा काळ ग्रामीण पत्रकारितेचा असल्याचे संकेत दिले.
कार्यशाळेत बोलताना ग्रामीण पत्रकारिता स्वरूप आणि अपेक्षा याविषयी पत्रकार श्रीनिवास नागे यांनी तर वृत्त आणि वृत्त संकलन याविषयी संपादक मंगेश मंत्री यांनी मार्गदर्शन केले. शेखर जोशी यांनी वृत्तपत्रांची स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट केली.तर चिंतामनराव सहस्त्रबुद्धे यांनी वृत्तपत्र्याच्या बदलत्या भाषेविषयी चिंता व्यक्त केली.
काळानुसार ग्रामीण पत्रकारांनी स्वत:ला बदलायला पाहिजे. अधिक तंत्रस्नेही झाल्यास ग्रामीण पत्रकारितेतसुद्धा खूप संधी आहेत. असेच सर्व मान्यवरांनी मत व्यक्त केले.