वार्ताहर / देवराष्टे
यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात प्रथमच बिबट्याचे दर्शन घडले आहे. याचबरोबर गव्याचेही आगमन अभयारण्यात झाले आहे. अभयारण्यात लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये बिबटा कैद झाला आहे.
सागरेश्वर अभयारण्य मानवनिर्मित आहे. हरणांसाठी प्रसिद्ध असणार्या या अभयारण्याचा विस्तार 10.64 चौ.किमी आहे. अभयारण्यात तीन वनगवे व बिबट्या आढळल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नियमावली करावी लागणार आहे.