सहायक आयुक्त ज. बा. करीम
प्रतिनिधी / सांगली
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केलेल्या व आधार कार्ड नंबर, ईमेल, मोबाईल नंबर लिंक न केलेल्या उमेदवारांनी नोंदणीमध्ये आधार कार्ड नंबर, ईमेल, मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांनी नोंदणी आधारकार्डशी लिंक केलेली नाही त्यांनी www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करावी. अन्यथा सेवायोजन कार्ड रद्द होईल याची संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
तसेच ज्या बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करून ऑनलाईन जॉबफेअर, करिअर गायडन्स व इतर योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0233-2600554 वर संपर्क साधावा, असे आवाहनही करीम यांनी केले आहे.