प्रतिनिधी / इस्लामपूर
शिराळा तालुक्यातील सोनवडे येथील महिलेवर बलात्कार प्रकरणातील आरोपी अरुण उर्फ बाबू सुनिल जमदाडे (२०.रा.सोनवडे) याला पहिले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश एस.सी.मुनघाटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जमदाडे याला या गुन्ह्यापूर्वी शाळकरी मुलावरील अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी डिसेंबर २०२० मध्ये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे.
अंत्यत विकृत असणाऱ्या जमदाडे याने दि.९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हे निच कृत्य केले. अत्याचारीत महिला ही आरळा येथून काम संपवून घरी जात असताना, तिला निर्जन ठिकाणी अडवून गुन्हेगाराने बलात्कार केला. तसेच या प्रकाराबद्दल इतरत्र वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोकरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.या खटल्यात जिल्हा सहा.सरकारी वकील रणजित एस.पाटील यांनी काम पाहिले.