वार्ताहर / उमदी
सोन्याळ ता.जत येथील नदाफ फाटा येथे राहणाऱ्या खाजेवली बापूसो नदाफ यांचे बंद घर अज्ञात चोरांनी फोडून घरातील एकूण एक लाख एकतीस हजार रुपयांची किंमती वस्तू व हिरो होंडा मोटारसायकल चोरले आहे.याची नोंद उमदी पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे .यामध्ये २४००० रुपये किमतीच्या तीन ग्राम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठी,१०००० रुपये किमतीच्या पाच ग्रामची एक सोन्याची अंगठी, ३००० रुपये किमतीच्या लहान मुलांच्या तीन अंगठ्या,१५०००रु. किमतीची भोरमाळ, १३००० रुपयाची गळ्यातील सोन्याची चैन,२०००० किमतीची गळ्यातील सोन्याची नक्षी असलेला दागिना,६००० रुपयांची वेगवेगळ्या आकाराचे पाचशे ग्राम वजनाची चांदीच्या दागिने, ४०००० रुपये रोख रक्कम असा एकूण माल अज्ञात चोरट्यानी लंपास केला असून अधिक तपास सपोनि पंकज पवार करीत आहेत.