जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची माहिती
प्रतिनिधी/सांगली
जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरामध्ये सांगली जिह्यातील मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यातील प्रत्येक बाधित कुटुंबाला 10 हजार रूपयेप्रमाणे मदत देण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱया टप्प्यातील एकूण 71 हजार 438 बाधीत कुटुंबाना 71 कोटी 43 लाख 80 हजार रूपय अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. उर्वरित बाधित कुटुंबासाठी सानुग्रह अनुदान वाटप प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
आतापर्यंत सानुग्रह अनुदान वाटप केलेल्या बाधित कुटुंबांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे : मनपा क्षेत्र – 30495, मिरज ग्रामीण – 1202, अप्पर सांगली ग्रामीण – 9988, वाळवा – 9906, अप्पर आष्टा – 3522, शिराळा – 1653, पलूस – 14672.
मयत पशुधन अनुदान वाटप
वाळवा, अप्पर आष्टा, शिराळा व पलूस तालुक्यातील एकूण 75 लाभार्थ्यांना 18 लाख 36 हजार रूपये मयत पशुधनासाठी अनुदान दिले असून मिरज तालुक्यामध्ये अनुदान वाटप सुरू आहे. तालुकानिहाय मयत पशुधन अनुदान वाटप पुढीलप्रमाणे : वाळवा – 36 लाभार्थ्यांना 7 लाख 94 हजार रूपये, अप्पर आष्टा – 10 लाभार्थ्यांना 3 लाख 7 हजार रूपये, शिराळा – 8 लाभार्थ्यांना 2 लाख 45 हजार रूपये, पलूस – 21 लाभार्थ्यांना 4 लाख 90 हजार रूपये.
शेतजमिनीचे नुकसान अनुदान वाटप
वाळवा व शिराळा तालुक्यात 2 कोटी 13 लाख 82 हजार 600 रूपये इतके अनुदान शेतजमिनीच्या नुकसानीपोटी वाटप करण्यात आले असून मिरज व पलूस तालुक्यात अनुदान वाटप प्रक्रिया सुरू आहे. तसेच घर पडझड, गोठे, झोपडÎा, बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, कुक्कुटपालन शेड, जमीन खरडून जाणे इत्यादीचे अनुदान वाटप प्रकिया सुरू आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.