गाव बैठकीत एकमताने निर्णय : नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई
ओटवणे / प्रतिनिधी:
सांगेलीत सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत असून यात काही जणांचा मृत्यूही झालेला आहे. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सांगेलीत आज गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून गुरूवारी १७ जून रात्री १२ पर्यंत आठ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय गावबैठकीत एकमताने घेण्यात आला. या कडक लॉकडाऊनमधून मेडिकल, डाँक्टर या अत्यावशक सेवेसह सध्या खरीप हंगामास प्रारंभ झाल्याने शेतकरी वर्गाला वगळण्यात आले आहे. तसेच या जनता कर्फ्यूमध्ये गावात नियमांचे कोणीही उल्लंघन केल्यास तसेच विनामास्क कोणीही आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी घरोघरी जंतुनाशक फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन जनता कर्फ्यू मध्ये रेशन दुकानही बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच माडखोल – सांगेली नवीन रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.