सावंतवाडी/ वार्ताहर-
गेले महिनाभर वादाच्या भोवऱ्यात असलेले सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये अखेर महिन्याभरानंतर दोन डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत या आरोग्य केंद्रात आता पती-पत्नी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य भार स्वीकारला आहे डॉक्टर मुकुल पंचवाडकर व त्यांची पत्नी डॉक्टर शलाका सावंत पंचवाडकर असे दोन डॉक्टर आता या रुग्णालयात कारभार पाहत आहेत दोन दिवसापूर्वीच यांची नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी डॉक्टर शिल्पा पाटील या कार्यरत होत्या मात्र त्यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात आली आहे