गोवा बोर्ड अध्यक्ष भगिरथ शेटय़े, शिक्षण उपसंचालक दयानंद चावडीकर यांचा सहभाग
प्रतिनिधी / सांगे
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटय़े तसेच शिक्षण खात्याचे उपसंचालक दयानंद चावडीकर यांनी सांगे-केपे तालुक्यांतील दहावी व बारावी परीक्षांच्या विविध केंद्रांना सदिच्छा भेटी देऊन तेथील केंद्र प्रमुखांच्या भेटी घेतल्या. तसेच परीक्षासंदर्भात त्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले व आवश्यक त्या सूचना केल्या.
सुरुवातीला त्यांनी कुडचडे येथील न्यू एज्युकेशन इन्स्टिटय़ूट केंद्राला भेट दिली. यावेळी मुख्याध्यापिका सुप्रिया महाले, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप काकोडकर यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या शालांत परीक्षेतील यशाबद्दल गायत्री उत्कर्ष आवडे तसेच राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त झालेला हायस्कूलचा विद्यार्थी यश प्रहर सावर्डेकर यांचा यावेळी खास सन्मान करण्यात आला. उपसंचालक चावडीकर यांनी रोख अडीच हजार व रोख एक हजार अशी इनामे प्रदान केली व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही अधिकाऱयांनी हायस्कूलच्या शिक्षक वर्गाशी संवाद साधला.
त्यानंतर चंद्रभागा हायर सेकंडरी स्कूल केंद्र, कुडचडे, युनियन हायस्कूल, सांगे, सरकारी हायस्कूल, वाडे-कुर्डी, आदर्श सरकारी प्राथमिक विद्यालय, विलियण-भाटी व नव्याने स्थापन केलेले नेत्रावळी सरकारी हायस्कूल केंद्र यांना त्यांनी भेटी दिल्या व पाहणी केली. यावेळी अध्यक्ष शेटय़े व उपसंचालक चावडीकर यांनी शिक्षकांशी चर्चा केली तसेच आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य महेश भगत, भारत स्काऊट आणि गाईडचे ज्ये÷ पदाधिकारी नरहरी नाईक, केपे स्काऊट व गाईड संघटनेचे पदाधिकारी अभय गावस देसाई, माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे संचालक रोहन गावस देसाई इत्यादी मान्यवर याप्रसंगी हजर होते. संध्याकाळी दोन्ही अधिकाऱयांनी रिवण-सांगे येथील संस्कृत वेद पाठशाळेला भेट देऊन विद्यार्थी व गुरुजनांशी संवाद साधला आणि होतकरू पालक व विद्यार्थ्यांचा सन्मान केला.