प्रतिनिधी /मडगाव
साळावली जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे उद्या शुक्रवार दि. 19 आणि शनिवार दि. 20 नोव्हेंबर रोजी सांगे, केपे, सासष्टी आणि मुरगांव या तालुक्मयांना मर्यादित पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
उद्या शुक्रवार दि. 19 रोजी 160 एमएलडी साळावली जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 8.00 ते संध्याकाळी 4.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे 19 आणि 20 नोव्हेंबर 2021 रोजी साळावली पाणीपुरवठा विभागाकडून सांगे, केपे, सासष्टी आणि मुरगांव तालुक्मयांना मर्यादित पाणीपुरवठा केला जाणार आहे. सर्व ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.