प्रतिनिधी / सांगे
सांगे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आज सोमवार 10 रोजी होणार असून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज सांगे पालिकेचे मुख्याधिकारी मनोज कोरगावकर यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. यंदा नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने भाजपाचे समर्थन लाभलेल्या स्वेता सुप्रज नाईक तारी यांनी, तर विरोधी गटाच्या फौजिया शेख यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज सादर केले आहेत.
उपनगराध्यक्षपदासाठी कॅरोज प्रुझ व मेशू डिकॉस्ता यांनी अर्ज सादर केले आहेत. आज सोमवारी सकाळी 11 वा. पालिका सभागृहात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवड मतदानाद्वारे करण्यात येणार आहे. भाजपाचे समर्थन लाभलेले सहा उमेदवार सांगे पालिकेत असून नगराध्यक्षपदी स्वेता नाईक तारी व उपनगराध्यक्षपदी कॅरोज प्रुझ यांची निवड होण्याची शक्मयता आहे.