प्रतिनिधी / सांगे
सांगे भागात गेल्या चार पाच दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू असून जनतेला गैरसोयीचे होत असले तरी विज खात्याच्या कर्मचाऱयांना नाकीनऊ होत आहे. सततच्या पडणाऱया वादळी पावसाने कधी झाडांची मोडतोड होईल याचा थांगपत्ता नाही. दरवषी पावसाळय़ात हीच परिस्थिती निर्माण होत असून वीज खाते मात्र सुस्त आहे. त्यातच अपुऱया वीज कर्मचाऱयामुळे दिरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. सांगे भागात भूमिगत विज वाहिन्या घालण्यात आल्या असल्या तरी अजून जोडण्या दिलेल्या नाहीत. तसेच अनेक ठिकाणी बंच कॅबल घालून वीज पुरवठा नेला असला तरी कोणतीच सुधारणा दिसून येत नसल्याने वीज ग्राहकांत कमालीची नाराजी पसरली आहे.
सांगे तेथील वीज कॅट्रोल रूम मध्ये चारच कर्मचारी असतात. परंतु ते कुठे बिघाड झल्यास दुरुस्तीसाठी गेले असल्यास कॅट्रोल रूम मध्ये कोणीच नसतात. असल्यास लाईनमन दुरुस्ती कामासाठी गेले आहेत, अशी उत्तरे रात्रीच्या वेळी दिली जाते, त्यामुळे तक्रार देणाऱयास बराच काळ प्रत्येक्षेत राहावे लागले असा लोकांचा अनुभव आहेत. या कॅट्रोल रूमवर खरोखरच काही चांगले लाईनमन असून तक्रारी जास्त व कर्मचारी कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी लक्ष घालून किमान पावसाळय़ात तरी ज्यादा कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी समाज कार्यकर्ते मॅश्यू डिकॉस्ता यांनी केली आहे.
दर वषी वादळी पावसाने झाडांची पडजड होऊन वीज तारा तुटणे, खांब मोडणे हे नित्याचे बनले आहे. त्यातच सांगेचे क्षेत्र बौगोलिक दृष्टय़ा मोठे असल्याने सध्याचा कर्मचारी अपुरा पडतो. या परिस्थितीत जनतेचा रोष वीज कर्मचाऱयांना पत्करावा लागतो. रात्री अपरात्री फिरतांना वीज कर्मचार्यकडे धड सुरक्षेच्या दृष्टीने विजेरी, पायात गमबुट, हात मोजे हे साहित्य असणे गरजेचे आहे. वादळी वाऱयाने झालेला बिघाड शोधण्यासाठी दोन कर्मचारी अंधारात फिरणे म्हणजे जोखीम पत्करण्यासारखे आहे. त्यामुळे विज ख्यात्याच्या वरिठाणे याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
अनेक कर्मचारी निवृत्त झाले असून त्यांच्या जागी नियुक्ती झालेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱयांची कमतरता भासते. उगे आणि सांगे पालिका क्षेत्रातील गायब झालेली वीज पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी सांगे कॅट्रोल रूममधील अपुऱया कर्मचाऱयांवर येऊन पडतो.
अमडई येथील एकमेव ट्रान्सफॉर्मर वर सांगे पालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक दोनचे क्षेत्र असून अमडई येथील वाहिन्यांवर एखादा बिघाड झाल्यास पुर्णपणे वीज गायब होते. त्यामुळे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी डिकॉस्ता यांनी केली आहे. त्याचबरोबर आवश्यक लाईनमन, हेल्पर व कर्मचाऱयांची गरज खात्याने पूर्ण करण्याची मागणी मॅश्यू डिकॉस्ता यांनी केली आहे. वीज मंत्र्यांनी याकडे गंबिर्याने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे. सहायक अभियंता दिनेश गोम्स त्यांचे सहकारी व कर्मचारी आपल्या परीने जनतेला सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न करतात, मात्र ज्यो काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याची गरज श्री. दिकॉस्ट यांनी व्यक्त केली आहे. सांगेच्या विकासासाठी सावित्री कवळेकर याही प्रयत्नरत असून वीज समस्या सोडविण्यासाठी त्या देखील आपल्यापरीने वीज मंत्री निलेश काब्राल व खात्याच्या वरिठाकडे प्रयत्न करीत असल्याचे दिकॉस्ट यांनी सांगितले.