प्रतिनिधी / सांगोला
किसान रेल्वेमुळे खेडेगावातील लहान व मोठÎा शेतकऱयांना देशातील बाजारपेठ उपलब्ध होत असल्याचा आनंद होत आहे. कृषी क्षेत्रात किसान रेल्वे व किसान उड्डाणामुळे मोठा बदल होत असून आत्तापर्यंत 99 किसान रेल्वेमधून शेतकऱयांचा 27 हजार टन माल वाहतूक केली आहे. सांगोला येथून पश्चिम बंगाल येथील शालिमारमध्ये फक्त चाळीस तासात शेती माल पोहोचणार आहे. सरकारकडून शेतकऱयांना सशक्त आणि समृद्धी करण्यासाठी अनेक योजना तयार असून त्या अंमलातही आणल्या जात आहेत. शेतकऱयांविषयी आम्ही फक्त बोलत नसून करून दाखवतो. हे किसान रेल्वेतून दिसून येत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
सांगोला ते शालिमार (पश्चिम बंगाल) या शंभराव्या किसान रेल्वेला सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
सांगोला रेल्वे स्थानकावर खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, गजानन भाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱयांचा विकास झाला तरच देशाचा विकास होणार आहे, यासाठी रेल्वेतर्फे सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील. शेतकरी स्वावलंबी झाला तरच देश स्वयंपूर्ण होईल. कृषी क्षेत्र व रेल्वे मंत्रालय एकत्रित काम करून शेतकऱयांना समृद्ध बनवण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल असे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना सांगितले.
कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, आपला देश कृषिप्रधान म्हणून ओळखला जातो, परंतु या अगोदर शेतकऱयांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. कृषी क्षेत्रातील रोजगार निर्मितीतही वाढ झाली नाही. आमच्या सरकारने शेतकऱयांसाठी अनेक योजना तयार करून शेतकऱयांना स्वयंपूर्ण बनविले. तसेच यापुढे कृषी क्षेत्रातील रोजगार निर्मितीत वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
शेतकऱयांच्या मालाला चांगला दर मिळणार
शेतकऱयांना माल पाठवताना 50 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच शेतकऱयांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, त्यामुळे शेतकऱयांच्या मालाला चांगला दर मिळणार आहे. – खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर
– किसान रेल्वेमुळे शेतकऱयांना मिळतेय नवीन बाजारपेठ
– सांगोल्यातील डाळिंबासह इतर शेती मालाची वाहतूक
– 3 महिन्यात 27 हजार टन मालाची वाहतूक
40 तासात 2 हजार 132 किलोमीटरचा प्रवास