प्रतिनिधि / म्हापसा
रविवारी रात्री चोगम रोड, सांगोल्डा उतारावर ट्रक आणी पल्सर मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गिरी येथील यश सुहास मांदेकर (19) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात मोटरसायकलवर मागे बसलेला उत्कर्ष छब्बीलाल बागरी हा किरकोळ जखमी झाला त्याच्यावर म्हापशाच्या जिल्हा इस्पितळात उपचार सुरु आहेत. साळगांव पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून यशचा मृतदेह शवचिकित्सेनंतर सोमवारी दुपारी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती निरीक्षक मिलींद भुईंबर यांनी दिली. दरम्यान, रविवारी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनीटांच्या सुमारास यश मांदेकर, मागे बसलेल्या सहकार्यासहित आपल्या पल्सर मोटरसायकलवरून (क्र ः जीए-03 क्मयु /2436) पर्वरीहून चोगम रोडच्या बाजूने सांगोल्डात येत असता समोरून भरधांव आलेल्या ट्रकने (क्र ः एम एच-08 एपी – 4959) ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी ट्रकच्या जोरदार धडकेत जबर जखमी झालेल्या यश मांदेकर तसेच उत्कर्ष बागरी या दोघांना तात्काळ म्हापशाच्या जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले यावेळी डय़ुटीवरिल डॉक्टरांनी यश मांदेकरला मृत घोषित केले.
दरम्यान, सांळगांव पोलिसांनी या अपघातास जबाबदार असलेल्या स्वर्ण सिंग (गुरुदासपुर-पंजाब ) याच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली असून सध्या त्याची रवानगी स्थानिक पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. उप-निरीक्षक उल्हास खोत सांळगांवचे पोलिस निरीक्षक मिलींद भुईंबर तसेच एसडीपीओ संतोष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.