प्रतिनिधी / कोल्हापूर
पंचगंगा नदीमध्ये सांडपाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतींनी त्यावर प्रक्रिया करावी. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेला निधी फक्त अशा प्रक्रिया प्रकल्पांवरच खर्च करावा. तसेच इचलकरंजी नगरपरिषदेने क्लस्टर पध्दतीने सांडपाणी उचलून प्रक्रिया करून प्रदूषण रोखण्याबाबतचा आराखडा सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा नदी प्रदूषणबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलंडे, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, महापालिकेच्या 96 एमएलडी पाण्यापैकी 91 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करुन ता पंचगंगेत सोडले जाते. त्याच पध्दतीने पंचगंगा नदीकाठावर असणाया ग्रामपंचायती आणि इचलकरंजीमधील औद्योगिक कारखाने यांनीही सांडपाण्यावर प्रकिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. यावर कालबध्द कार्यक्रम करावा. इचलकरंजीमध्ये डाईंग युनिट घरोघरी आहेत. यामधून बाहेर पडणार्या पाण्यावर काय प्रक्रिया करता येईल. क्लस्टर पध्दतीने हे पाणी साठवून उचलता येईल का याबाबतचा आराखडा नगरपालिकेने तयार करावा.
ते पुढे म्हणाले, नदीकाठावर असणाया ग्रामपंचायतींनीही स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्राप्त झालेला यावर्षीचा निधी केवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरच खर्च करावा.
जिल्हाधिकारी देसाई यांनी प्रदूषण करणाया प्रकल्पांना नोटीस पाठवून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तपासणीच्या सूचना आंधळे यांना दिल्या. झेडएलडी करण्याबाबत वीज वापर तपासणीच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, इचलकंरजी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे आदी उपस्थित होते.
दूध पिशव्यांबाबत इको सिस्टीमसाठी नियोजन करा
घरोघरी प्लास्टिकच्या पिशव्यांमधून दूध पोहचवण्यात येत असते. या पिशव्यांबाबत इको सिस्टीम काय करता येईल याबाबत दूध उत्पादक संस्थांची जिल्हाधिकायांनी बैठक घेवून त्यांच्याकडून नियोजन आराखडा घ्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
`आय इट प्लास्टिक’ पथदर्शी प्रकल्प राबवा
‘आय इट प्लास्टिक’ असे घोषवाक्य घेवून महापालिकेने नाविन्यपूर्णमधून पथदर्शी प्रकल्प राबवावा. तसा प्रस्ताव पाठवा, असे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले.
पंचगंगेच्या शेजारील गावांसाठी दीड कोटी मंजूर
पंचगंगेच्या आजूबाजूला उचगाव, गांधीनगर, तळंदगे, पाचगाव अशा गावांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्रकल्प करावा. त्यासाठी दीड कोटी मंजूर करण्यात आले आहेत. महिन्याभरात डीपीआरचे काम पूर्ण करावे. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.