एकाचा मृतदेह सापडला, दुसऱयाचा शोध सुरू
प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील सांडेलावगण-कासारी येथे खाडीमध्ये कालव काढण्यासाठी दोघे तरूण भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल़े ही घटना शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडल़ी यापैकी एकाचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला असून दुसऱयाचा शोध घेण्याचा प्रयत्न जयगड पोलिसांकडून करण्यात येत आह़े
संजय भिकाजी गुरव (42) व संतोष तुकाराम पिंपळे (45, ऱा देघेही चाफेरी गुरववाडी) अशी दोघा बुडालेल्यांची नावे आहेत़ यापैकी संजय गुरव यांचा मृतदेह आढळून आला आह़े जयगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय गुरव व संतोष पिंपळे यांच्या सह 6 जण शनिवारी सकाळी सांडेलावगण कासारी बंधारा खाडीजवळ कालव काढण्यासाठी गेले होत़े
खाडीमध्ये कालव व मासेमारी करत असताना अचानक खाडीमधील पाण्याची पातळी वाढण्यास सुरूवात झाल़ी यावेळी संजय व संतोष हे खोल पाण्यामध्ये ओढले गेल़े काही क्षणातच ते खाडीच्या पाण्यामध्ये दिसेनासे झाल़े ही घटना त्यांच्यासोबत असलेल्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरूवात केल़ी मात्र दोघांचाही पत्ता लागू शकला नाह़ी
खाडीकिनारी झालेला आरोडा-ओरडा ऐकून तेथील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतल़ी आजूबाजूच्या खाडीकिनारच्या परिसरात शोध घेतला असता संजय याचा मृतदेह आढळून आल़ा या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक कृष्णा भोये यांनी घटनास्थळाला भेट दिल़ी संतोष याचा अद्याप सापडून आलेला नसल्याने पोलिसांकडून स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात येत आह़े पुढील तपास जयगड पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल ड़ी टी साळवी करत आहेत़