प्रतिनिधी / पणजी
सांताक्रूझ मतदारसंघाच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या समितीची बैठक मेरशी येथे नुकतीच पार पडली. यामध्ये भाजयुमोच्या नूतन समितीची दयेश वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.
या बैठकीला सांताक्रूझ मतदारसंघाचे आमदार टोनी फर्नांडिस, सांताक्रूझ भाजप मंडळ अध्यक्ष प्रमोद कामत, प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे, गोवा भाजयुमोचे अध्यक्ष अध्यक्ष समीर मांद्रेकर, सरचिटणीस अखिल पर्रीकर, जि. पं. सदस्य गिरीश उस्कैकर, तुळशीदास मडकईकर, शैलेश पै, संदेश शिरोडकर, आदींसह अन्य सदसय उपस्थित होते.
दयेश वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या समितीत सरचिटणीस सनी कुंकळयेकर, उपाध्यक्ष विश्वेश गोवेकर, रोहिदास प्रियोळकर, राहूल नाईक, चिटणीस रोहिदास कळंगूटकर, खजिनदार-आदित्य वाटवे, सदस्य- प्रथम कामत, अभिषेक गोसावी, ईशान साखरदांडे, रोहन बोरकर, शांताराम गोवेकर, रोहिदास पियोळकर, शांताराम गोवेकर, सोहेल मांद्रेकर, आदींसह 31 जणांचा समावेश आहे.
यावेळी आमदार टोनी फर्नांडिस, प्रमोद कामत, समीर मांद्रेकर आदींनी मार्गदर्शन केले.