अन्य प्रांतांमधून स्थायिक होण्यासाठी येत आहेत लोक
ख्रिसमसचे होमटाउन अशी ओळख, सांता म्युझियम अन् पोस्ट कार्यालय
जगात एक असे ठिकाण आहे, जेथे वर्षभर नाताळाचे वातावरण राहते. अमेरिकेच्या इंडियाना प्रांतातील ‘सांता क्लॉज’ असे या ठिकाणाचे नाव आहे. केवळ नावच नव्हे तर या शहराला ख्रिसमस होमटाउन म्हणून ओळखले जाते. येथील बहुतांश व्यवसाय नाताळावेळी वापरल्या जाणाऱया गोष्टींशी संबंधित आहेत. सांता टॉयज, सांताचे कँडी कैसल, सांता हाउस, सांता क्लॉज म्युझियम आणि सांता व्हिलेजचा यात समावेश आहे.
येथील रस्त्यांची नावे सिल्वर बेल सर्कल, मिस्टलेटो ड्राइव्ह, डोंडर लेन, मॅन स्टेम आणि ख्रिसमस बुलेवर्ड ठेवण्यात आली आहेत. याचबरोबर पोस्ट ऑफिस, टाउन हॉल, सांता लॉज आणि एक रियल इस्टेट एजेन्सीच्या ऑफिसबाहेर सेंट निकची मूर्ती येथील ओळख आहे. महामारीच्या काळात येथील रियल इस्टेट व्यवसायाला मोठी तेजी आली आहे.
मागील दोन वर्षांमध्ये ख्रिसमस लेक व्हिलेजमध्ये 50 हून अधिक घरे निर्माण करण्यात आली आहेत. दर महिन्याला आता 20 ते 30 घरांसाठी विचारणा होतेय असे तेथील प्रॉपर्टी मॅनेजर क्रिस एंब्स यांनी सांगितले. तर खजिनदार केली ग्रीलिच यांच्यानुसार मागील नोव्हेंबरमध्ये मागणी वाढल्याने केवळ 5 घरेच शिल्लक राहिली होती. कॅलिफोर्निया, मिनेसोटा आणि इलिनॉयमधून मोठय़ा संख्येत लोक येथे स्थायिक होण्यासाठी येत आहेत.
सांता क्लॉसाठी येतात पत्रे
आतापर्यंत सांताला लिहिण्यात आलेली पत्रे नॉर्थ पोलमध्ये पोहोचत असल्याचे मानले जायचे. पण प्रत्यक्षात सर्व पत्रं सांता क्लॉज पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचतात. चीफ एल्फ पॅट कोच यांच्यानुसार त्यांचे वडिल जिम येलिंग यांनी 1914 मध्ये हे सत्र सुरू केले होते. येथे सुमारे 25 हजार पत्रं येतात, एल्फची टीम प्रतिदिन 2 हजार पत्रांना उत्तर देत आहेत.