प्रतिनिधी/ पणजी :
सांतीनेज येथील गणपती मंदिराकडे असलेल्या थिगुर विहीरीच्या नुतनीकरण्याची wपायाभरणी काल ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सांतीनेज यथील थेगुर विहीर ही खूप जुनी विहीर असून अनेक वर्षापासून तिच्या सौंदर्यिकरण करण्यात आले नव्हते नुकतेच जलस्त्रोत खात्याअंतर्गत त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, असे पणजी महानगर पालीकेचे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.
पणजीत बोप्-द -वॉक व थिगुर विहीर या दोन्ही खूप जून्या विहीरी असून या ठिकाणी नैसर्गिक झरे वाहत आहे. बाराही महिने या झऱयामध्ये पाणी वाहत असते. या झऱयांचे तसेच विहरीचे सौदर्यिकरण करुन त्यांचे जतन करण्यासाठी आम्ही या विहीरीचे नुतनीकरण करण्याचे ठरविले आहे. या विहीर पणजीचा वारसा स्थळे आहे. त्यामुळे त्यांचे जतन होणे गरजेचे आहे, असे महापौर म्हणाले.
या विहीरीच्या चारही बाजूनी भिंती बाधल्या जाणार आहे. त्यामुळे पावसाळय़ात या विहीरीला पूर येत असतो. हे पाणी लोकवस्तीत घूसु नये यासाठी या मोठय़ा भिंती बांधल्या जाणार आहेत. बोप्-द -वॉक येथील विहीरीचे काम पूर्ण केले आहे. या दोन्ही विहीरी या पणजीच्या सर्वात जून्या विहीरी आहे. जलस्त्राsत खात्यामार्फत त्यांचे संवर्धन करणे गरजेच हेते. पणजीचे आमदार बाबूश मोन्सरात तसेच मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी पुढाकार घेतल्याने हे काम शक्य झाले आहे.
या विहीरीमध्ये पूर्वी अनेक लोक पोहण्यासाठी जात होते. अजूनही काही लोक या विहीरीच्या जून्या आठवणी सांगतात. मनपाचे अनेक नगरसेवक महपौर या विहीरीमध्ये पोहण्यासाठी जात होते. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात थेगूर नावाचे मासे मिळत असल्याने या विहीरला थिगूर हे नाव ठेवण्यात आले. धोबी या ठिकाणी कपडे stधुण्यासाठी येत असतात.