बेक निकामी झालेल्या ट्रकची दुचाकीला धडक
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा दर्ग्याजवळ ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने दुचाकीला एसटी बसवर मागून चिरडल़े या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल़ा सांत्वनासाठी जाताना शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडल़ी जखमीला उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े
सुमित्रा सोनू कोत्रे (65, ऱा कापडगांव रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आह़े तर दीपक सोनू कोत्रे (29) असे अपघातातील जखमीचे नाव आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक व सुमित्रा कोत्रे हे कापडगाव येथील रहिवासी असून ते कामानिमित्त रत्नागिरी शहरात वास्तव्यास असतात़ शनिवारी सकाळी ते कापडगांव येथे मयत झालेल्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी गेले होत़े सकाळी 11.30 वाजता दीपक हा आई सुमित्रा कोत्रे हिला दुचाकीवर (एमएच 08 एएल 1299) बसवून पुन्हा रत्नागिरीकडे येत होत़ा
हातखंबा दर्ग्याजवळ एसटी बस (एमएच 14 बीटी 4238) पळूस-रत्नागिरी ही चालवत होत़े यावेळी मागून येणारा ट्रक (केए 22 डी 2555) याचा ब्रेक निकामी झाल्याने दीपक याच्या ताब्यातील दुचाकीला थेट एसटी बसवर नेवून चिरडल़े या अपघातात सुमित्रा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाल़ा तर दीपक याच्या पाय व पोटाकडील भागाला दुखापत झाल़ी त्याला तातडीने रत्नागिरी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आह़े या अपघातानंतर घटनास्थळी लोकांचा जमाव होवू लागल्याने ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढल़ा अद्याप तो फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.दरम्यान अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्य हे पुढील तपास करत आहेत़