सलग दुसऱया दिवशीही शंभरी पार : बेळगाव तालुक्मयात 77 नवे रुग्ण, महिलेचा मृत्यू, खबरदारी घेण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्ण संख्येने सलग दुसऱया दिवशीही शंभरीचा आकडा पार केला आहे. बुधवारी 122 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. गुरुवारी 104 नवे रुग्ण आढळून आले असून सांबरा एटीएसमधील 35 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका बेळगाव तालुक्मयात 77 नवे रुग्ण आढळून आले असून 45 वषीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 867 वर पोहोचली असून सक्रिय रुग्ण संख्या 476 इतकी झाली आहे. या रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास गेल्यावषी प्रमाणेच यंदाही इस्पितळात बेडची कमतरता भासणार याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आतापर्यंत 27 हजार 13 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेळगाव येथील 45 वषीय महिलेचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 345 वर पोहोचला आहे. अद्याप 2 हजार 600 हून अधिक जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने स्वॅब तपासणी संख्या वाढविली आहे. जिल्हय़ात 35 हजारांहून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
देसूर, के. के. कोप्प, मंडोळी रोड, विजयनगर, आदर्शनगर-वडगाव, अनगोळ, चव्हाट गल्ली, गंगानगर, महांतेशनगर, शहापूर, शास्त्राrनगर, श्रीनगर, शिवबसवनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एका टिळकवाडी परिसरात 5, सह्यादीनगर येथील 3, सदाशिवनगर येथील 4, राणी चन्नम्मानगर परिसरातील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
याबरोबरच उगार खुर्द, होसकोटी, चमकेरी, चिक्कोडी, सौंदत्ती, घोडगेरी, गिळीहोसूर, हागेदाळ, खानापूर, मेंडील, मोळे, नरसापूर, रायबाग, पट्टीहाळ, यलीमुनवळ्ळी, भोज परिसरातही नवे रुग्ण आढळून आले असून जेएनएमसी कॅम्पसमधील एका 26 वषीय डॉक्टर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी बाधितांच्या यादीत डॉक्टरांची नावे आहेत. बुधवारी जेएनएमसी कॅम्पसमधील हॉस्टेलमधील 22 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा परिसरात प्रशासनाने मायक्रो कंटाईन्मेंट झोन म्हणून घोषित केले होते.
बेळगावात नियम आणखी कडक होणार
सध्याची परिस्थिती लक्षात घेता शहरातील वेगवेगळय़ा भागांत रुग्ण संख्या वाढत चालली आहे. एकीकडे लसीकरणही सुरू आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. सध्या वेगवेगळय़ा राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचार सुरू आहे. निवडणुकीनंतर बेळगावात नियम आणखी कडक होणार आहेत. बाजारपेठेतील चित्र पाहता सरकारने कोरोना थोपविण्यासाठी गंभीर उपाय योजना अंमलात आणली तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे मतदानानंतर नियम आणखी कडक होणार आहेत.