स्थानिकांना त्रास : शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक बसवण्याची मागणी
वार्ताहर /सांबरा
सांबरा येथे महामार्गावर चुकीच्या पद्धतीचे गतिरोधक बसविल्याने तेथील स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे. तरी संबंधित अधिकाऱयांनी चुकीचे गतिरोधक काढून त्याठिकाणी शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. येथील बेळगाव-बागलकोट मार्गावर गेल्या काही दिवसांपूर्वी चुकीच्या पद्धतीचे गतिरोधक बसविण्यात आले आहेत. या गतिरोधकामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा तर नाहीच. उलट वाहनांच्या आवाजामुळे नागरिकांची झोपमोड होत आहे. तरी संबंधित अधिकाऱयांनी याठिकाणी तातडीने शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.