वार्ताहर / सांबरा
शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीला कुस्तीकडे आकर्षित करण्यासाठी सांबरा येथे आयोजित गावमर्यादित कुस्त्या उत्साहात पार पडल्या. या मैदानात सुमारे 90 हून अधिक कुस्त्या झाल्या.
प्रारंभी सर्व बालकुस्तीपटूंना कुस्तीची प्राथमिक माहिती देऊन कुस्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर अनेक कुस्त्या लावण्यात आल्या. गावामध्ये अनेक पैलवान तयार व्हावेत, यासाठी पुढील काळामध्ये कुस्तीगीर संघटना कार्यरत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कुस्ती कमिटीचे सदस्य शीतल तिप्पाण्णाचे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या कुस्त्या पुरस्कृत केल्या होत्या.
सहभागी सर्व मल्लांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. त्यानंतर खाऊचे वाटप करण्यात आले.
मैदान यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शिवाजी चिंगळे, मुकुंद मुतगेकर, शिवाजी जत्राटी, इराप्पा जोई, लक्ष्मण सुळेभावी, भरमा चिंगळी, कृष्णा जोई, भुजंग धर्मोजी, मोहन हरजी, यल्लाप्पा जोगाणी, सिदाई जाधव, शिवाजी मालाई, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, नितीन चिंगळी, महेंद्र गोठे, तिप्पाण्णा हणमाई, यल्लाप्पा हरजी, प्रवीण ताडे, भुजंग धर्मोजी, परशराम धर्मोजी यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.