प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळूर विमानतळावर सोमवारी सकाळी जीवंत बॉम्ब आढळल्यानंतर बेळगावात खबरदारी बाळगण्यात आली आहे. सोमवारी सांबरा विमानतळ व रेल्वे स्थानक परिसरात श्वान पथक व स्फोटक तज्ञांनी तपासणी केली.
मंगळूर विमानतळावर दहा किलोचा बॉम्ब आढळून आला होता. सायंकाळी तो स्फोटकतज्ञांनी स्फोट घडवून निकामा केला. या पार्श्वभूमीवर बेळगाव परिसरातही व्यापक खबरदारी घेण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी मारिहाळचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांनी विमानतळाला भेट देवून पाहणी केली.
विमानतळाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले पोलीस व औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी मार्गदर्शन केले. मंगळूर घटनेच्या पार्श्वभूमीवर सांबरा विमानतळाकडे जाणाऱया वाहनांवरही पोलिसांनी बारकाईने नजर ठेवली आहे. एका अनोळखीने ऑटोरिक्षातून येवून मंगळूर विमानतळावर जीवंत बॉम्ब ठेवल्याचे उघडकीस आल्यानंतर विमानतळाकडे येणाऱया प्रत्येक वाहनांवर लक्ष ठेवण्यात येत होते. यासंबंधी कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्याशी संपर्क साधला असता बेळगाव परिसरातही खबरदारी घेण्यात आली असून मोक्मयाच्या ठिकाणी तपासणी वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.