ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील जतवाल येथे लष्कराच्या वर्दीतील 4 संशयित स्थानिकांना दिसले. त्यांच्या हातात बॅग्ज होत्या. स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी शोधमोहीम सुरू केली.
एसएचओ पीएस घागवाल म्हणाले, चान कन्ना येथील स्थानिक रहिवासी रवींद्र कुमार यांनी आज पहाटे साडेपाचच्या सुमारास लष्कराच्या गणवेशातील 4 संशयित रेल्वे गेट चॅन कन्ना, जतवालजवळ महामार्गाच्या दिशेने जाताना पाहिले. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.