ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. सीमेवर घुसखोरी करण्यात अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तानने आता गेल्या काही महिन्यांत ड्रोन कारवाया वाढवल्या आहेत. मंगळवारी जम्मूच्या सांबामधील विजयपूर, रामगड आणि गढवाल भागात संशयित ड्रोनच्या हालचाली पहायला मिळाल्या. सांबामध्ये संशयित ड्रोन दिसण्याची ही तिसरी वेळ आहे.
2 ऑगस्टच्या रात्री उशिरा सांबामधील बारी ब्रह्मना भागातील लष्कराच्या छावणीजवळ चार ठिकाणी संशयित ड्रोन दिसले होते. तसेच यापूर्वी सांबामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी संशयित ड्रोन दिसले होते. त्यामुळे सीमाभागात सध्या सुरक्षा दल सतर्क आहेत.