गॅस्ट्रो हा आजार पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. उलटी, संडास हा आजार विषाणू, किटाणूमुळे होते. दूषित पाणी हे एक याचे मुख्य कारण आहे.
लक्षणे : उलटी, संडास होणे, पोटात कळ येणे, तहान लागणे, कॉलरामुळे उलटी, संडासमध्ये तांदळाच्या पेजेसारखी होते. यात डिहायड्रेशन जास्त प्रमाणात होते.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे जीभ कोरडी होते, त्वचेची लवचिकता कमी होते.
- प्राण्याचे प्रमाण फारच कमी झाले तर रूग्ण दगावू शकतो.
उपचार कोणते?
- गॅस्ट्रो झालेल्या रुग्णांना सलाईन देऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवणे हाच मुख्य उपचार आहे. जेव्हा आजार कमी प्रमाणात असतो तेव्हा तोंडावाटे मीठ-साखर पाणी याचे मिश्रण घेणे सर्वात चांगले. जरी उलटी होत असेल तरी थोडेथोडे मीठ-साखर-पाणी/नारळ पाणी/लिंबाचे सरबत देत राहावे आणि दवाखान्यात न्यावे.
- ‘ओआरएस’ पावडर एक लिटर पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतो.
प्रतिबंध : शुद्ध पाणी पिणे, पाणी शक्यतो तापवून थंड करून पिणे किंवा फिल्टरचे प्यावे. बाहेरच्या वस्तू आणि उघडे, शिळे पदार्थ खाणे टाळावे. जेवण करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे.