प्रतिनिधी/ पणजी
‘टेरा न्युलियस’ हे प्रदर्शन सेरेंडिपिटी आर्ट्स फाऊंडेशन उपक्रमांसाठी फ्रान्सचा प्रमुख भागीदार म्हणून आहे. फ्रान्समधील सर्वात महत्त्वाच्या छायाचित्रण महोत्सवांपैकी एक असलेल्या 2022 रेनकॉन्dटेस डी’आर्ल्ससाठी, सेरेंडिपिटी फाऊंडेशनच्या सदस्यांना सेरेंडिपिटी आर्ल्स ग्रँटच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यासाठी फ्रान्समध्ये आमंत्रित करण्यात आले होते. भागीदारीच्या या भावनेने भारतातील प्रेंच संस्थेचे संचालक इमॅन्युएल लेब्रुन-डॅमियन्स आणि सेरेंडिपिटी आर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक आणि संरक्षक सुनील कांत मुंजाल यांनी नुकतेच या भागीदारीला सक्रीय करण्यासाठी दोन वर्षांकरिता करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
फ्रान्स हा महोत्सवाचा प्रमुख भागीदार असून भारतातील समकालीन कलानिर्मितीला पाठिंबा देतो. भारतातील फ्रान्सच्या दूतावासाने – भारतातील प्रेंच संस्थेने 2022 सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलच्या निमित्ताने फ्रान्स आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी सेरेंडिपिटी आर्ट्स फाउंडेशनसोबत करार केला. हा करार भारतातील कला महोत्सव आणि समकालीन निर्मितीसाठी संरक्षक आणि भागीदार म्हणून फ्रान्सच्या कायम भूमिकेची पुष्टी करतो. सोफी काले, ओलिव्हर सागाझॅनसारख्या प्रेंच कलाकारांना सेरेंडिपिटी कला महोत्सवाच्या मागील आवृत्त्यांमध्ये ठळकपणे वैशिष्टय़ीकृत करण्यात आले होते. यंदा महोत्सवात इंडो-प्रेंच फ्लेवरमध्ये फ्रान्सचे सेंटर नॅशनल डेस आर्ट्स प्लॅस्टिक्स आणि ज्येऊ दी पौमे या प्रदर्शनाचा समावेश आहे.
’टेरा न्य?लियस’, सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल 2022 चे प्रमुख इंडो-प्रेंच प्रदर्शन असून हे इमेजरीच्या नवीन माध्यमांना समर्पित असलेले प्रदर्शन आहे जे प्रतिमेशी असलेल्या आमच्या नातेसंबंधांना आव्हान देण्याचा प्रयत्न करते. 2020 मध्ये प्रेंच संस्कृती मंत्रालयाने ‘इमेज 3.0’ या शीर्षकाखाली सुरू केलेल्या राष्ट्रीय फोटोग्राफी कमिशनचा प्रभाव यात आहे.- फोटोग्राफिक आणि डिजिटल पद्धती एकत्र करणाऱया कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वषी फ्रान्समध्ये प्रथमच रिम्समध्ये आणि पॅरिस फोटो फेअरमध्ये सादर करण्यात आली. सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून, यातील आठ कलाकृती महोत्सवाच्या मध्यवर्ती ठिकाणांपैकी एक असलेल्या ऐतिहासिक जुन्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये 23 रोजीपर्यंत प्रदर्शित केल्या जातील.