वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स संचालक ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड जॉन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून मंगळवारी भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने (साई) तो मंजूर केला आहे.
भारतातील कोरोना महामारीचे रूग्ण वाढत असल्याने ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड जॉन यांनी 18 ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा राजीनामा साईकडे पाठविला होता. कोरोनापासून सावधगिरी बाळगण्याकरिता जॉन यांनी हा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाला परत जाण्याची इच्छा त्यांनी यापूर्वी वर्तविली होती. हॉकी इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी जॉन यांचे अलिकडे मतभेद झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान साईने जॉन यांच्या करारात वाढ केली होती. डेव्हिड जॉन यांचा साईबरोबरचा करार 2021 च्या सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला होता.