ऑनलाईन टीम / शिर्डी
साईबाबांच्या शिर्डीत दहशतवाद्यांनी रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरात एटीएसने दुबईवरुन आलेल्या तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. तपासादरम्यान त्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिली असून, ते पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.
मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. दुबईत या दहशतवाद्यांना अटक झाली होती. तपासात त्यांनी शिर्डीचे मूळ रहिवासी आणि सध्या दिल्लीत असलेले एका हिंदी चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या शिर्डीतल्या घराची रेकी केल्याची कबुली दिली आहे. या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत. या प्रकरणात सहा मौलवींसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.