जगदंबा हंगरगा, मराठा स्पोर्ट्स मण्णूर, अयोध्या कडोली, चव्हाटा कुदेमनी संघ विजयी
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक ग्रामीण टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून जगदंबा हंगरगाने शिवसेन खादरवाडीचा, मराठा स्पोर्ट्स मण्णूरने न्यू स्टार मच्छेचा, आयोध्या कडोलीने काळ भैरवनाथ गौंडवाडचा, चव्हाटा स्पोर्ट्स कुदेमनीने एमसीसी मच्छेचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. यल्लाप्पा कांबळे, आकाश बेन्नाळकर, अजय भोसले, शंकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिनडेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात शिवसेना खादरवाडीने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 7 गडी बाद 100 धावा केल्या. त्यात राकेश देसाईने नाबाद 27 तर ऋषिकेनश 22 धावा केल्या. हंगरगातर्फे यल्लाप्पा व बलराम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना जगदंबा हंगरगाने 9.2 षटकात 4 गडी बाद 101 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. त्यात यल्लाप्पाने 32, तर कल्लाप्पाने नाबाद 31 धावा केल्या. दुसऱया सामन्यात न्यू स्टार मच्छेने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 7 गडी बाद 89 धावा केल्या. त्यात फैजुल एम ने 21, अझहरने 17, सोहेलने 12 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे राजुने 3 तर आकाशने 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना मराठा स्पोर्ट्स मण्णूरने 9.3 षटकात 3 गडी बाद 92 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. त्यात आकाशने 38, जितेशने 19, अनिलने 13 धावा केल्या. मच्छेतर्फे अनिलने 2 गडी बाद केले. तिसऱया सामन्यात काळभैरवनाथ गौंडवाडने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 9 गडी बाद 92 धावा केल्या. त्यात परशरामने नाबाद 24, मनोजने 20 धावा केल्या. आयोध्या कडोलीतर्फे गजाननने 4 तर आकाश कटांबळेने 3 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना आयोध्या कडोलीने 7.2 षटकात 5 गडी बाद 88 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. त्यात अजय भोसलेने नाबाद 34, ज्ञानेशने 17, तर तुकारामने 10 धावा केल्या. गौंडवाडतर्फे विशालने 2 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात चव्हाटा स्पोर्ट्स कुदेमनीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 77 धावा केल्या. त्यात राजूने 31 तर शंकरने 22 धावा केल्या. मच्छेतर्फे शुभमने 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना एमसीसी मच्छेने 8 षटकात 6 गडी बाद 77 धावाच केल्याने सामना टाय झाला. त्यात गजाननने 22, महेशने 13 धावा केल्या. चव्हाटातर्फे शंकर व राहुलने प्रत्येकी 2 गडी बाद केले. सामना टाय झाल्याने पंचांनी सुपर ओव्हर नियमाचा वापर केला. सुपर ओव्हरमध्ये चव्हाटा कुदेमनीने 2 गडय़ांनी सामना जिंकला.
रविवारचे सामने – श्री गणेश कणबर्गी वि. मराठा स्पोर्ट्स तुरमुरी सकाळी 9 वा., ब्रम्हलिंग बेनकनहळ्ळी वि. पहिल्या सामन्यातील विजेता सकाळी 10.30वा. बाळेकुंद्री वॉरियर्स वि. सहारा स्पोर्ट्स संतीबस्तवाड दुपारी 12 वा., इंडियन बॉईज हिंडलगा वि. बालाजी स्पोर्ट्स हलगा दु. 1.30 वा., दक्ष स्पोर्ट्स निलजी वि. एस. एस. स्पोर्ट्स मुचंडी यांच्यात दु. 3 वा.