बेळगाव : साईराज स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित साईराज चषक आंतरराज्य निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण करण्यात आले.
सदर स्पर्धा गुरूवार दि. 4 फेब्रुवारीपासून व्हॅक्सिन डेपो मैदानावर सुरू होत आहे. सोमवारी चषकाच्या अनावरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जगजंपी बजाजचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी, पुरस्कर्ते महेश फगरे, सामाजिक कार्यकर्ते जॅकी मस्करनेस, गजानन फगरे, अमर सरदेसाई, जोतिबा गिलबिले, अमर नाईक, उत्तम शिंदे, राजू राठी, रोहित फगरे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते चषकाचे अनावरण करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 48 संघांनी भाग घेतला आहे. मंगळवार व बुधवारी आठ संघात प्रदर्शनीय सामने होणार आहेत.
मंगळवारी उद्घाटनाचा सामना पेडाई बेळगाव विरूद्ध पत्रकार संघ, सकाळी 10 वा., आधार सोसायटी वि. हेस्कॉम यांच्यात दुपारी 12 वा., फौंड्री क्लस्टर वि. महानगरपालिका यांच्यात दुपारी 2 वा., टिळकवाडी पोलीस वि. सिव्हील इंजिनियरिंग यांच्यात सायं. 4 वा. सामना खेळविण्यात येणार आहे.