विराट, क्रिकेट फास्ट, शीतल, सीटीएम संघ विजयी
बेळगाव : साईराज स्पोर्टस् क्लब आयोजित साईराज चषक वार्ड निहाय क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात विराट स्पोर्टस् बी.के. स्पोर्टस्चा, क्रिकेट फास्ट संघाने एवायसीचा, शीतल रामशेट्टीने सेवन स्टार संघाचा, सीटीएमने गो-गो संघाचा, विराटने मराठा स्पोर्टस्चा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. राहुल शिंदे, सुनील पाटील, अक्षय गोरण्ण्णा, नागेश कलपत्री, यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सीन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात विराट स्पोर्टस् संघाने 8 षटकांत 7 बाद 73 धावा केल्या. राहुल शिंदेने 46 धावा केल्या. बी.के. तर्फे नवीन व नागेश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. बी.के. स्पोर्टस्ला 8 षटकात 9 बाद 72 धावा करता आल्या.
त्यात पुंडलीने 35 धावा केल्या. विराटतर्फे सुरजने 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात ए.वाय.सी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 9 बाद 53 धावा केल्या. त्यात मिलींद बेळगांवकरने 30 धावा केल्या. क्रिकेट फास्टतर्फे निरवीलने 3 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना क्रिकेट फास्ट संघाने 8 षटकांत 4 बाद 54 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. त्यात सुनील पाटीलने 18, विष्णुने 12 धावा केल्या. एवायसीतर्फे सलीम व मिलींद आणि बेळगांवकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
तिसऱया सामन्यात स्टार स्पोर्टस संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 4 बाद 69 धावा केल्या. त्यात संदेशने 32 धावा केल्या. शीतलतर्फे अमीत व अक्षय यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना शीतल रामशेट्टी संघाने 7 षटकांत 6 बाद 72 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. त्यात अक्षय अभिषेक यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या.
चौथ्या सामन्यात सीटीएम संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 7 बाद 54 धावा केल्या. त्यात संतोषने 15 धावा केल्या. त्याला उत्तर देताना गो-गो संघाने 8 षटकांत 8 बाद 51 धावाच केल्या. त्यात अक्षयने 25 धावा केल्या. सीटीएमतर्फे नागेश कलपत्रीने 5 धावांत 5 गडी बाद केले.
पाचव्या सामन्यात मराठा स्पोर्टने 8 षटकांत 5 बाद 72 धावा केल्या. त्यात संकेतने देसाईने 21, तेजस पवारने 12 धावा केल्या. विराटतर्फे राहुल शिंदेने व अभिषेक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना विराट संघाने 7.4 षटकांत 6 बाद 73 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. त्यात राहुल शिंदेने 25, अर्जुनने 15 धावा केल्या. मराठातर्फे तेजस पवार व प्रताप यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
मंगळवारचे सामने
अनगोळ स्पोर्टस् वि. काव्या स्पोर्टस सकाळी 9 वाजता, 2) साई स्पोर्टस् वि. अरविंद स्पोर्टस सकाळी 10.30 वाजता, 3) सिद्धकला अनगोळ वि. क्रिकेट फास्टर्स सकाळी 12 वाजता. 4) गोल्डन स्पोर्टस् वि. पहिल्या सामन्यातील विजेता संघ.