क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक वॉर्डनिहाय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी विराट स्पोर्ट्स संघाने शहापूर संघाचा 7 गडय़ांनी, एपीएस वॉरियर्स संघाने सीटीएम संघाचा 9 गडय़ांनी, साईराज संघाने विराट 16 संघाचा 32 धावांनी, विराट स्पोर्ट्सने क्रिकेट फर्स्ट् संघाचा 48 धावांनी तर अनगोळ स्ट्रायकर संघाने गोल्डन स्पोर्ट्स संघाचा सुपर ओव्हरमध्ये विजय मिळविला. शहाबाज बोजगार, जोतिबा गिलबिले, अनिल सप्लीगा, राहुल शिंदे, वसंत शहापूरकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर काल गोल्डन स्पोर्ट्स व अनगोळ स्ट्रायकर्स संघात सामना टाय झाला होता. सुपर ओव्हर बुधवारी खेळविण्यात आला. त्यामध्ये गोल्डन स्पोर्ट्सने 1 षटकात 1 बाद 10 धावा केल्या. त्याला उत्तर देताना अनगोळ स्ट्रायकर्स संघाने 4 चेंडूत बिनबाद 11 धावा करून सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला.
पहिल्या सामन्यात शहापूर संघाने 8 षटकात 6 बाद 77 धावा केल्या. त्यात अमरने 26, आकाशने 20 धावा केल्या. विराट 16 तर्फे सुनिल व रवी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्याला उत्तर देताना विराट 16 संघाने 6.5 षटकात 3 बाद 80 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला.
दुसऱया सामन्यात सीटीएम संघाने 8 षटकात 7 बाद 46 धावा केल्या. त्यात आकाशने 11 धावा केल्या. एपीएसतर्फे जोतिबा गिलबिलेने 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना एपीएस वॉरियर्सने 3.3 षटकात 1 बाद 47 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. त्यात भाऊ व पवन शर्मा यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. तिसऱया सामन्यात साईराज संघाने 8 षटकात 3 बाद 92 धावा केल्या. त्यात नानू आर ने 38, अनिल सप्लिगाने 29, आनंद चव्हाणने 19 धावा केल्या. त्याला उत्तर देताना विराट 16 संघाचा डाव 7.1 षटकात 58 धावात आटोपला. त्यात आनंद के. 17 तर अमर सरदेसाईने 16 धावा केल्या. साईराजतर्फे अनिल सप्लिगाने 3 आनंद पी, आनंद चव्हाण व दीपक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात विराट स्पोर्ट्स संघाने 8 षटकात 4 बाद 93 धावा केल्या. त्यात राहुल शिंदेने 39 तर गुरूप्रसादने 22 धावा केल्या. क्रिकेट फास्टतर्फे सुजितने 2 गडी बाद केले.
त्याला उत्तर देताना क्रिकेट फास्ट संघाने 8 षटकात 8 बाद 45 धावाच केल्या. त्यात रोशनने 17 धावा केल्या. विराटतर्फे बबन व सुरजने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
गुरूवारचे सामने
शितल रामशेट्टी वि. एपीएस वॉरियर्स सकाळी 9 वा., मि. व्हीसीसी वि. अलरजा 10.30 वा. क्रिकेट लव्हर्स वि. शिवशक्ती स्पोर्ट्स 12 वा., रॉयल स्ट्रायकर्स वि. पहिल्या सामन्यातील विजेता.