कै. रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
कै. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित पहिल्या रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साईराज वॉरियर्सने एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचा तर डीके लायन्स संघाने लॉगर संघाचा पराभव केला. शुभम भादवणकर, विनोद देवाडिगा यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात व साईराज वॉरियर्स संघाने 20 षटकात सर्व बाद 163 धावा केल्या. त्यात नरेंद मांगुरेने 29, आदित्य कलपत्रीने 28, विठ्ठल हबिबने 23, तर संतोष सुळगे पाटीलने 20 धावा केल्या. एक्ट्रीमतर्फे गोलंदाजी करताना सदानंद सोगलदने 35 धावात 6 गडी बाद केले. त्याला आकाश कटांबळेने 27 धावात 2 तर बसवराज हणमण्णावरने 21 धावात 2 गडी बाद करत सुरेख साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाने 20 षटकात 9 बाद 157 धावाच केल्या. त्यात वैभव संघमित्रने 58, गुरूप्रसाद पोतदार व बसवराज हणमण्णावर यांनी प्रत्येकी 19 तर गजानन पाटीलने 14 धावा केल्या. साईराजतर्फे शुभम भादवणकरने 19 धावात 4, विठ्ठल हबिबने 32 धावात 2 तर भरत गाडेकर व नरेंद्र मांगुरे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात लॉगर संघाने 20 षटकात 5 बाद 148 धावा केल्या. त्यात अंगदराज हित्तलमनीने 32, निलेश पाटीलने 29, सलमान गोकाककरने 26 तर पुनित दीक्षितने नाबाद 22 धावा केल्या. डीके लायन्सतर्फे केतज कोल्हापुरेने 25 धावात 3 तर डॉमनिक फर्नांडिसने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल डीके लायन्सने 18.1 षटकात 4 बाद 151 धावा करून सामना 6 गडय़ानी जिंकला. त्यात विनोद देवाडिगाने 4 षटकार, 5 चौकारासह 83, रवी उकळीने 42, डॉमनिक फर्नांडिसने 21 धावा केल्या. लॉगरतर्फे काशीर काझरने 32 धावात 2 तर पुनित दीक्षित व ज्ञानेश होनगेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बेन्नी पिंटू, मोहन, संतोष, रमेश, बैलॉन, मेहबूब, संदीप यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल आकाश कटांबळे, सर्वाधिक षटकार वैभव संघमित्र, इम्पॅक्ट खेळाडू सदानंद सोगलद, सामनावीर शुभम भादवणकर, तर दुसऱया सामन्यात शिल्पा कक्केरी, आरती भाटी, पूजा बेल्लद, रिचा होनकरी, यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल ज्ञानेश होनगेकर, सर्वाधिक षटकार विनोद देवाडिगा, इन्पॅक्ट खेळाडू रवी उकळी, सामनावीर विनोद देवाडिगा यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
गुरूवारचे सामने – विश्रुत स्ट्रायकर्स वि. अर्जुन स्पोर्टस् हुबळी टायगर्स सकाळी 9 वा. 2) लॉगर वि. साई स्पोर्ट्स.