बेळगाव : दीपक नार्वेकर पुरस्कृत 16 वर्षाखालील बीपीसी लिग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साईराज हुबळी टायगर्सने सहारा स्पोर्ट्सचा 55 धावांनी तर अलोन स्पोर्ट्सने एमसीसीसी संघाचा 36 धावांनी पराभव केला. भेदक गोलंदाजी करणाऱया रोहन यारीशमी, (हुबळी टायगर्स) व यश हावळाण्णाचे (अलोन) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानात खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साईराज हुबळी संघाने 25 षटकात 4 बाद 240 धावांचा डोंगर रचला. त्यात केदार उसुलकरने 1 षटकार, 12 चौकारासह 65 चेंडूत 83, रोहन यारीशमीने 3 षटकार, 3 चौकारासह 22 चेंडूत 48 तर नवदीप मराठेने 1 षटकार, 7 चौकारासह 46 धावा केल्या. सहारा स्पोर्ट्सतर्फे जुबेर सावनूर, साई कारेकर, मनोज सुतार, राजेंद्र दिगण्णावर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर सहारा संघाला 25 षटकात 7 बाद 185 धावापर्यंत मजल मारता आली. त्यात साई कारेकरने 6 चौकारासह 61, राजेंद्र देवगण्णावरने 1 षटकार, 5 चौकारासह 42, रोहन तालबेलकरने 17 धावा केल्या. साईराज हुबळीतर्फे दर्शन मयेकरने 25 धावात 2, रोहन यारीशमीने 32 धावात 2, सुजल पाटील, अवधूत साठे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात अलोन स्पोर्ट्सने 25 षटकात 8 बाद 183 धावा केल्या. त्यात आदित्य हिरेमठने आक्रमक फलंदाजी करताना 5 उत्तुंग षटकार व 4 चौकारासह केवळ 29 चेंडूत 57 धावा, रोहन बेकवाडकरने 4 चौकारासह 41, यश हावळाण्णाचेने 4 चौकारासह 31, रजान मुल्लाने 24 धावा केल्या. एमसीसीसीतर्फे केदार खटावकरने 38 धावात 3, भुवन बसडोणीने 21 धावात 2 तर मनीकांत बुकिटगार व सुजल कळसण्णावर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
त्यानंतर एमसीसीसी स्पोर्ट्सला 25 षटकात 8 बाद 147 धावाच करता आल्या. राहुल नाईकने 5 चौकारासह 60, मनिकांत बुकिटगारने 4 चौकारासह 33, रेहान सनदीने 2 चौकारासह 23 धावा केल्या. अलोनतर्फे ऋषीकेश पाटीलने 34 धावात 2, यश हावळाण्णाचेने 37 धावात 2, ओमकार देशपांडे, सिध्दार्थ हुलोळी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे महेश फगरे, बाळकृष्ण पाटील, नागेश देसाई, अजित पाटील, सतीश मोरे, दीपक नार्वेकर, आरीफ बाळेकुंद्री यांच्या हस्ते रोहन यारीशमी व यश हावळाण्णाचे यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात
आले.