दोडामार्ग / वार्ताहर:
दोडामार्ग शहरातील ओम श्री. दादा साई मंदिर मठातील मठाधिपती श्री दादा साईंचा रविवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी 65 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मंदिर – मठात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी श्री साईबाबा मूर्ती प्रगटन दिन साजरा करण्यात येणार आहे. श्री साईंची पालखी उत्सव, महाआरती, भजन, कीर्तन, प्रवचन, आनंदी यात्रा अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा भक्तगणांनी, भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री दादा साई यांनी केले आहे.