खेबवडे येथील घटना
कोल्हापूर/प्रतिनिधी
खेबवडे (ता. करवीर) येथे नवरात्र उत्सवासाठी लावलेल्या साऊंड सिस्टीम लावल्याचा कारणातून तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये वैभव भोपळे (वय 30) हा मृत झाला. या प्रकरणी सुरज पाटील या संशयिताचा शोध सुरू आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, वैभव भोपळे याची साऊंड सिस्टीम आहे. दुर्गा माता कार्यक्रमासाठी ही सिस्टीम गावातील डेअरी मध्ये लावली होती. याच ठिकाणी संशयित सुरजची लाईट व्यवस्था आहे. मात्र काही कारणास्तव ही लाईट व्यवस्था जोडण्यास उशीर झाला. यामुळे अन्य कोणाची लाईट जोडण्यात आली. याचा राग मनात धरून सुराजने वैभव सोबत वाद करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेला आणि याच वादातून चिडून सुरजवर चाकूने वार केले. या मध्ये वैभव गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सिपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्य झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, संशयित सुराजच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.