मुंबई\ ऑनलाईन टीम
देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. काही सेलेब्रिटी मंडळींना देकील कोरोना संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. दक्षिणचा सुपरस्टार जुनिअर एनटीआर याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतः ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.
ज्युनियर एनटीआरने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताना त्यांने म्हटले आहे की, ‘माझी कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे. मी स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला वेगळे ठेवले आहे. आम्ही डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्व कोविड प्रोटोकॉल फॉलो करत आहोत. मी गेल्या काही दिवसांत माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांना त्यांची कोविड चाचणी करवून घेण्याची विनंती करतो. सुरक्षित रहा, असे म्हटले आहे. त्याच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्याचे चाहते तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
ज्युनियर एनटीआर लवकरच एस.एस. राजामौलच्या बहुप्रतिक्षित आरआरआर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो अभिनेता राम चरण सोबत महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आरआरआर हा एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे.