वृत्तसंस्था / लंडन
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील झालेल्या सामन्यात साऊदम्पटन फुटबॉल क्लबने वेस्ट ब्रॉमविच अल्बियॉनचा 2-0 अशा गोल फरकाने पराभव केला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आता वेस्ट ब्रॉमविच 17 व्या स्थानावर आहे.
या सामन्यात साऊदम्पटनतर्फे मोसा डिजेनिपो आणि ओरियॉल रोमु यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत साऊदम्पटनने गोल करण्याच्या किमान दोन संधी गमविल्या. वेस्ट ब्रॉमविचला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. मध्यंतराला 4 मिनिटे बाकी असताना मोसाने साऊदम्पटनचे खाते उघडले. सामना संपण्यास 20 मानिटे बाकी असताना रोमुने साऊदम्पटनचा दुसरा गोल नोंदवून वेस्ट ब्रॉमविचचे अव्हान संपुष्टात आणले.