बेळगाव / प्रतिनिधी
मतदानादिवशी साखरपुडा असल्याने नियोजित दाम्पत्याने आधी साखर भरवून एकमेकांचे तोंड गोड केले. त्यानंतर मतदान केंद्रावर जावून आपले कर्तव्य पार पाडले. मतदानादिवशी लग्न व साखरपुडय़ाचे मुहूर्त असल्याने बऱयाच ठिकाणी लग्नाची धामधूम पाहायला मिळत होती.
खासबाग येथील पूजा हलगेकर यांचा विशाल नावगेकर यांच्याशी साखरपुडा मराठा मंदिरच्या मराठा मंगल कार्यालय होसूर या ठिकाणी होता. त्यांनी समारंभातून वेळ काढून वर्धाप्पा गल्ली, खासबाग येथे मतदान केले.