चालू सत्रातील 15 नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी : इस्माची माहिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतामधील साखरेचे उत्पादन 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत जवळपास 24 टक्क्यांनी वधारुन 20.9 लाख टन झाले आहे, अशी माहिती साखर उद्योगातील मुख्य संघटना भारतीय साखर मिल संघ (इस्मा) यांनी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमध्ये अधिकचे उत्पादन झाले आहे. तसेच आतापर्यंत साखर कारखान्यांकडून 25 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी करार केला आहे.
दक्षिण आणि पश्चिम क्षेत्रातील काही साखर कारखान्यांनी सध्याच्या सत्रास सुरुवात केली असून साखरेचे उत्पादन सुरु केले आहे. यामुळे आगामी काळातही सदरच्या साखरेचे उत्पादन वधारत जाणार असल्याची माहिती आहे.
साखरेचे व्यापारी वर्ष
साखरेचे व्यापारी वर्ष हे ऑक्टोबर ते सप्टेंबर पर्यंत चालते. यामध्ये चालू 2021-22 च्या सत्रात साखरेचे उत्पादन हे 20.90 लाख टन आहे, जे मागील वर्षात 15 नोव्हेंबर 2020 रोजी 16.82 लाख टन झाले होते.
साखर उत्पादन
- महाराष्ट्र 8.91 लाख टन
- उत्तरप्रदेश 2.88 लाख टन
- कर्नाटक. 7.62 लाख टन
ऑक्टोबर 2021 निर्यात 2.7 लाख टन