वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात साखरेचे उत्पादन चालू व्यापारी वर्षातील 15 डिसेंबरपर्यंत 61 टक्क्यांनी वाढून 73.77 लाख टनाच्या घरात पोहोचले आहे. चालू वर्षातील व्यापारी वर्षाची सुरुवात ही ऑक्टोबरमध्ये होते. याचदरम्यान ऊस गाळपासाठी नेण्याची प्रक्रिया सुरु होते. हा हंगाम महाराष्ट्रात थोडा लवकरच सुरु होत असल्याची माहिती आहे.
यामुळे साखर उत्पादनाचा स्तर चालू वर्षांत उच्चांकी पातळीवर राहिला आहे. खासगी साखर मंच भारतीय साखर कारखाना संघ (इस्मा) यांनी दिलेल्या माहितीमधून साखर कारखान्यांच्या व्यापारी वर्षात 2020-21 (ऑक्टोबर-सप्टेंबर) 73.77 लाख साखर उत्पादन झाले आहे. जे मागील समान वर्षात 45.81 लाख टन झाल्याची नोंद आहे.
उतर प्रदेशमध्ये उत्पादन मागील वर्षात याच कालावधीदरम्यान 21.25 लाख टनाच्या तुलनेत 22.60 लाख टन राहिले आहे. महाराष्ट्रामध्ये उत्पादन 7.66 लाख टनाच्या तुलनेत 26.96 लाख टन असल्याचेही इस्माने स्पष्ट केले आहे.