माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्यातर्फे पुढाकार. विविध खासगी अस्थापनांमध्ये रोजगारासाठी प्रयत्न. कुशल व अकुशल बेरोजगारांची एकत्रित केली जात आहे माहिती.
प्रतिनिधी / डिचोली
साखळी मतदारसंघातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी साखळीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धर्मेश सगलानी यांनी एक लिं?क पाठवून बेरोजगार कुशल व अकुशल युवक युवतींची माहिती ऐकत्रित करण्याच्ता कामाला प्रारंभ केला आहे. या माहितीच्या आधारे भविष्यात या बेरोजगार युवक युवतींच्या पात्रतेप्रमाणे आवश्यक असलेल्या ठिकाणी नोकरीची किंवा काही विशेष क्षेत्रात प्रवीण असलेल्यां?ना व्यवसायिक कामाची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, असे धर्मेश सगलानी यांनी सांगितले.
साखळी मतदारसंघात सध्या शिक्षित आणि अशिक्षित, कुशल व अकुशल बेरोजगार युवक युवतींची संख्या मोठी आहे. सर्वांनाच सरकारी नोरकी मिळवून देणे शक्मय नाही. तसेच सध्या सरकारतर्फे कितीतरी हजारोंच्या संख्येने नोकऱया उपलब्ध करून देण्यचे आश्वासन देण्यात आले असले तरी ते प्रत्यक्षात शक्मय आहे की नाही. याविषयी सर्वांनाच माहित आहे. अशा वेळी बेरोजगारांचा डेटाबेस तयार करून विविध खासगी अस्थापने, कंपन्यांमध्ये असलेल्या ओळखीचा वापर करून आपण दिलेल्या लिंकवर नोंदणी झालेल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी हा एक प्रयत्न आहे, असे सगलानी म्हणाले.
आपण व्हायरल केलेल्या लिंकवर प्रत्येक बेरोजगार युवक युवतींनी नों?दणी करताना आपल्या शिक्षण पात्रतेसह अतिरिक्त केलेल्या कोर्सेसची, कामाच्या अनुभवाची माहिती द्यावी. तसेच काही कमी शिक्षित उमेदवारांकडेही नोकरीतील अनुभवापेक्षा इतर दैनंदिन जिवनात घराघरांमध्ये आवश्यक पडणाऱया कामांचाही अनुभव असतो. त्या कामांमध्ये कौशल्य असलेल्या उमेदवारांनीही आपली नोंदणी करावी. जेणेकरून अनेकवेळा लोकांना घरातील वीज वायरिंग, प्ल?बिंग, गवंडीकाम, फरशी बसविणे, लाकूडकाम अशाप्रकारची अनेक कामे असतात, त्यासाठीही कुशल कारागिरांची अनेकवेळा तत्काळ गरज असते. अशा कारागिरांनाही हाती काम नसल्यास आवश्यकतेनुसार काम मिळवून देता येईल. अशी हि संकल्पना आहे.
सध्या कोवीड महामारी असल्याने अनेकांच्या लहान मोठय़ा व्यवसायांवरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे बेरोजगारीही वाढत चालली आहे. महामारीमुळे दैनंदिन जिवनाचा गाडा पुढे रेटणे मुश्कील बनत असताना आपल्या अंगातील सुप्तगुणांना तसेच कौशल्यगुणांना वाव देत उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपली संपूर्ण माहिती संबंधित लिंकवर उमेदवारांनी द्यावी. त्याआधारे त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार काम मिळवून देणे सोपे होईल.
सध्या खासगी क्षेत्रातही रोजगारांची संधी कमीच असली तरी लहान मोठय़ा कामांसाठी आवश्यक त्याठिकाणी खासगी कंपन्यांमध्ये आणि अस्थापनांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न चालूच आहे. यापूर्वीही अनेक बेरोजगार युवकांना खासगी अस्थापनांमध्ये रोजगार मिळवून देण्यास मदत केली आहे. त्याचप्रमाणे आता डेटाबेस गोळा करून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध खासगी कंपन्या व अस्थापनांशी आपली बोलणी सुरू असल्याचे सगलानी यांनी सांगितले.
त्यासाठी साखळी मतदारसंघातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवतींनी संबंधित लिंकवर आपली नोंणी करून माहिती द्यावी. आतापर्यंत पाचशेहून अधिक उमेदवारां?नी आपली नोदणी केली आहे. तरी राहिलेल्यां?नीही आपली नों?दणी करावी व आपल्या पात्रतेनुसार रोजगाराची संधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन नगरसेवक धर्मेश सगलानी यांनी केले आहे.