प्रतिनिधी /डिचोली
प्रतापनगर हरवळे येथे एका दुचाकीला झालेल्या स्वयं अपघातात सखळीतील एक 36 वषीय युवक जगीच ठार झाला. मयताचे नाव प्रसाद लक्ष्मीकांत शिरोडकर असे असून घरी पोहोचण्यासाठी 50 मीटर अंतरावर असतानाच सदर अपघात घडला.
सदर घटना काल मंगळ. दि. 27 जुलै रोजी दु. 2.30 वा. च्या सुमारास घडली. प्रसाद शिरोडकर हा आपल्या दुचाकीने (क्र. जीए 04 सी 2691) घरी येत असताना केवळ अवघ्याच अंतरावर काळाने त्यांच्यावर झडप घातली. वाहनावरील ताबा सुटल्याने त्याची दुचाकी रस्त्याशेजारील कुंपणाला धडकली. या घटनेत तो जागीच ठार झाला. या घटनेनंतर लगेच 108 रूग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. व त्यावा लागलीच साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या घटनेच पंचनामा करून मृतदेह बांबोळी येथे गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. आज बुध. दि. 28 रोजी उत्तरीय तपासणीअंती मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन देण्यात येणार आहे. या प्रकरणी डिचोली पोलीस निरिक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर रामानंद अधिक तपास करीत आहे. प्रसाद शिरोडकर हा अविवाहित आणि सुस्वभावी युवक होता. त्याचा निधनाने साखळीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.