डिचोली/प्रतिनिधी
साखळी मतदारसंघातील युवा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा साखळी काँग्रेस गट अध्यक्ष मंगलदास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन साखळीत येणाऱया काळात कोणत्याही नेत्याच्या हाताखाली काम न करता काँग्रेस पक्षाच्या झेंडय़ाखाली काम करण्याचा निर्धार करण्यात आला. तसे आवाहन गटाध्यक्ष मंगलदास नाईक यांनी केले. व त्यास मोठय़ा संख्येने उपस्थित युवा कार्यकर्त्यांनी सहमती दर्शविली.
साखळीतील डेलमॉन सभागृहात आयोजित या युवा मेळाव्याला राज्य युला काँग्रेसचे अध्यक्ष एड. वरद म्हार्दोळकर, सचिव गौतम भगत, साखळी युवा काँग्रेसचे अध्यक्ष रियाझ सय्यद, साखळी गटाध्यक्ष मंगलदास नाईक, डिचोली युवा काँग्रेसचे अध्यक्ष मनोज नाईक, गौतम प्रियोळकर, रोहन पालकर, अमित घाडी, फरहाश अखतर, दिनेश कु???डईकर, ग्रेन काब्राल, साईश आदींची उपस्थिती होती.
काँग्रेसला सत्तेवर आणून युवांची तादक दाखवून देऊ. – वरद म्हार्दोळकर.
राज्यात आज काँग्रेस पक्षाच्या युवा विभागाची ताकद मोठी आहे. राज्यातील विविध ज्वलंत विषयां?वर वरि÷ काँग्रेस नेत्यांबरोबर युवा फौज त्याच जोशाने सहभागी होऊन निदर्शने करतात. भविष्यात या राज्याला काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नसून त्यासाठी आतापासूनच कामाला लागणे महत्त्वाचे आहे. यावेळी काँग्रेस पक्षाला सत्तवर आणून युवा विभागाची ताकद संपूर्ण राज्याला दाखवून देऊ, असे आवाहन युवा अध्यक्ष एड. वरद म्हार्दोळकर यां?नी केले.
(Box) साखळी मतदारसंघात काँग्रेसच्या झेंडय़ाखाली संघटीतपणे कार्य करूया.
साखळी मतदारसंघाला काँग्रेस पक्षाचा मोठा इतिहास आहे. या मतदारसंघात आजही या पक्षाचे नि÷ावंत आणि स्वाभिमानी नेते व कार्यकर्ते आहेत. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला पुन्हा विजयी करण्यासाठी कोणा एका नेत्याच्या हाताखाली न वावरता केवळ काँ?ग्रेस पक्षाच्या झेंडय़ाखाली संघटीतपणे कार्य करूया. व मतदारसंघात काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी झटुया, असे आवाहन साखळी गटाध्यक्ष मंगलदास नाईक यांनी केले.
भाजप सत्ताकाळात गेली सुमारे 9 वर्षे गोवा राज्यात बेकारी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने आशेने असलेल्या युवा वर्गाची निराशा झालेली आहे. त्यासाठी राज्यातील युवावर्ग काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहे, असे राज्य युवा सचिव गौतम भगत यांनी म्हटले. या युवा मेळाव्याला मोठय़ा संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते.