साखळी/प्रातिनिधी :
” आदी सर्व प्रथम प्रत्येकाने आप आपल्या मनातील कोरोना विषयक भीती कडून टाकावी कोरोनाचा मुकाबला आपण सहजपणे करु शकतो फक्त नियमित मस्कचा वापर करा सामाजिक अंतर पळून काम करा सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा कोरोना विषयीं भिवपाची कायच गरज ना संदेश मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा दिला.
कोरोना विषाणूने सगळीकडे थैमान घातल्याने साखळी मतदार संघातील मतीमंद मुलांमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सांडू कंपनीची “सांडू शक्तीवर्धाक कीट” चे वितरण मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
कोरोना विषाणूचा सामना करुन यामधून मुक्त झाल्यानंतर पहिल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ.सावंत बोलत होते. कोरोना विषाणूचा मुकाबला सर्वांनी एकजुटीने करावा.सरकार सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहे नागरिकांनी सहकार्य करावे.असे मुख्यमंत्री म्हणाले.
सांडू कंपनीच्या सांडू फर्माकुटीकल्स आयुर्वेदीक विभागाने खास पुरस्कृत करुन उपलब्ध करुन दिले होते.यावेळी कंपनीचे प्रातिनिधी डॉ.संदीप सावंत व संजय सामंत यांचीही उपस्थिती होती.