प्रतिनिधी /फोंडा
आडपई येथील प्रसिद्ध चित्रकार सागर नाईक मुळे यांनी स्वातंत्रदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्रवीरांना आदरांजली वाहणारा 20भारत भूंय’ व्हीडीओ चित्रफित व पेंटींगचा अनावरण सोहळा आज गुरूवार 12 रोजी सायंकाळी 6 वा. तळावली येथील महालक्ष्मी युवक संघाच्या सभामंडपात आयोजित करण्यात आला आहे. सोहळयाला प्रमुख पाहूणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, खोर्लीचे जि. प. सदस्य सिद्धेश श्रीपाद नाईक, वाडी तळावलीचे सरपंच दिलेश गावकर, सामजिक कार्यकर्ते सुदेश भिंगी, सतीश थप्पर, लेखक साईश पै पाणंदीकर उपस्थित राहणार आहेत. हितचिंतक व कला प्रेमीनी उपस्थित रहावे असे आवाहन सागर नाईक मुळे यांनी केले आहे.